उपयोगितावाद (१): जॉन स्टुअर्ट मिल्
[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.] प्रकरण १: सामान्य आलोचने मानवी ज्ञानाची वर्तमान अवस्था अपेक्षेहून इतकी भिन्न असावी किंवा अतिमहत्त्वाच्या विषयांतील विचार इतका रेंगाळावा यांतील सर्वांत …